Marathi serial actress nauvari saree

पिवळ्या धम्मक नऊवारी साडीत प्राजाक्ता माळीचा मराठमोळा लुक, अदा पाहून चाहते म्हणतात लाखात एक....

असा होता प्राजक्ताचा लुक

यावेळी प्राजक्ताने पिवळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे. या नऊवारी साडीवर ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या हटके लुकवरून कोणाची नजर हटत नाही आहे. यावेळी तिने कमीत कमी मेकअप करून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तिने नेसलेल्या या साडीवर सोनेरी काठ देण्यात आला आहे. या साडीवर सिल्वर रंगाच्या दोऱ्यांनी नक्षी काढण्यात आली आहे. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.एखाद्या पारंपारिक साणाच्या दिवशी तु्म्ही देखील असा लुक ट्र्राय करू शकता.

पिंक रंगाची ब्लाऊज कॅरी केला आहे

प्राजक्ताचा प्रत्येक लुक खूपच वेगळा आणि युनिक असतो यावेळी देखील प्राजक्ताने यल्लो रंगासोबत पिंक रंगाची रंगसंगती करून हा लुक पूर्ण केला आहे.

Mike rann biography

या हटके लुकला पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने नक्षीदार असा पिंक रंगाचा ब्लाऊज कॅरी केला आहे. या ब्लाऊजवर जरी वर्क करण्यात आले आहे.एखाद्या कार्यक्रमाला किंवा सणाच्या दिवशी तुम्ही देखील तुमच्या साडीवर असा हटके ब्लाऊज कॅरी करू शकता.

प्राजक्ताच्या फोटोवरील कमेंट्स

प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेट्स केल्या आहेत.

यावेळी एका चाहत्यांनी मराठी संस्कृती जापतेस अशी कमेंट केली आहे. तर एका चाहत्यांने सौंदर्य म्हणजे तुच प्राजक्ताच्या या लुकवर भरभरून कमेंट्स आल्या आहेत. तिच्या या फोटोवरून कोणाचीच नजर हटत नाही आहे.

प्राजक्ताचा सिंपल मेकअप

हा लुक पूर्ण करण्यााठी प्राजक्ताने साधा मेकअप करून तिने तिचा लुक पूर्ण केलाय. प्राजक्ताचे काही चाहते तिच्या या लुकवर फिदा झाले आहेत.

यावेळी तिने सिंपल ब्राऊन रंगाची लिपस्टिक लावली आहे. आणि ग्लॅस लावून तिचा लुक पूर्ण केला आहे. तर हा लुक पूर्ण करण्यासाठी तिने लाल रंगाची सिंपल टिकली देखील लावली आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेट्स केल्या आहेत. तुम्ही देखील प्राजक्ताप्रमाणे सिंपल मेकअप करू शकता.

प्राजक्ताचे पारंपारिक दागिने

हा लुक पूर्ण करण्यासाठी प्राजक्ताने लफ्फा, मोहनमाळ, गहूमाळ, नथ, झुबे व शिंदेशाही तोडे परिधान केले होते.

पारंपारिक लुक ट्राय करणार असाल तर त्यावर पारंपारिक दागिने नक्की ट्राय करा पण दागिन्यांची निवड करताना तुमच्या कपड्यांचा रंग आणि दागिन्यांचा रंगाची निवड करा. प्राजक्ताचा हा लुक तुम्ही देखील ट्राय करू शकता. तुमच्या लाडक्या प्राजूचा हा लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा.